विरोधक खुशीत, भाजपामध्ये सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 23:59 IST2016-06-04T23:51:14+5:302016-06-04T23:59:27+5:30
अहमदनगर : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील भाजपच्या गोटात सन्नाटा पसरला आहे. भाजपाच्या एका गटात खुशी, तर दुसऱ्या गटात निराशा होती.

विरोधक खुशीत, भाजपामध्ये सन्नाटा
अहमदनगर : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील भाजपच्या गोटात सन्नाटा पसरला आहे. भाजपाच्या एका गटात खुशी, तर दुसऱ्या गटात निराशा होती. राजीनामा प्रकरणाबाबत भाजपचे कार्यकर्ते सावध प्रतिक्रिया देत होते. चौकशीत खरे काय आहे, ते कळेलच, असे काही सांगत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पक्ष वर्तुळात मात्र भाजप सरकारची पहिली विकेट गेल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान खडसे यांच्या राजीनामा प्रकरणी ‘मेरे देश में मेरा अपना घर आंदोलना’च्या वतीने नगर येथील हुतात्मा स्मारकात खडसे यांचा निषेध करण्यात आला. एका वाहनावर कांद्याचा प्रतिकात्मक दिवा लावून खडसे यांना निरोप देण्यात आला. राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आलेले असताना खडसे यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यास वेळ नव्हता, अशी टीका कारभारी गवळी यांनी केली.