साईसंस्थानचे तीन नंबरचे प्रवेशद्वार खुले करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:27+5:302020-12-16T04:36:27+5:30
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना दिलेल्या निवेदनात शहराध्यक्ष अमृत गायके, राजेंद्र जगताप, संपत जाधव, मारुती आळजकर, ज्ञानेश ...

साईसंस्थानचे तीन नंबरचे प्रवेशद्वार खुले करा
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना दिलेल्या निवेदनात शहराध्यक्ष अमृत गायके, राजेंद्र जगताप, संपत जाधव, मारुती आळजकर, ज्ञानेश गांगुर्डे, सचिन चौधरी, बाबासाहेब भुसारे यांनी निवेदन दिले.
साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून आता महिनाभराचा कालावधी लोटत आहे. साई संस्थानने मंदिर उघडल्यानंतर भाविकांसह स्थानिकांची दर्शनाची सोय गेट नंबर दोनमधून आत, तर पाच नंबर गेटमधून बाहेर पडण्याची व्यवस्था केली आहे. गर्दी टाळण्यासाठी, तसेच भाविकांचे सोयीस्कर दर्शन व्हावे यासाठी संस्थानने केलेली दर्शनाची ही उपाययोजना योग्य आहे. मात्र, साईसमाधी मंदिराचे दर्शन झाल्यानंतर थेट पाच नंबर गेटने बाहेर पडावे लागत असल्याने ग्रामदैवत हनुमान मंदिर, चावडी या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना लांब चक्कर मारून यावे लागते, असे निवेदनात म्हटले आहे.