...तरच आपल्याला मदत करणाऱ्या बँका टिकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:58+5:302021-03-21T04:19:58+5:30

संगमनेर : राज्यातील सहकारी बँकांमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत झाली. सहकारी बँकांमध्ये आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. बँकांच्या कर्जवसुलीसाठी प्रयत्न ...

... Only then will the banks that help you survive | ...तरच आपल्याला मदत करणाऱ्या बँका टिकतील

...तरच आपल्याला मदत करणाऱ्या बँका टिकतील

संगमनेर : राज्यातील सहकारी बँकांमुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत झाली. सहकारी बँकांमध्ये आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. बँकांच्या कर्जवसुलीसाठी प्रयत्न करणे, हे प्रत्येक सभासदाचे काम आहे. कर्जवसुली झाली तरच आपल्याला मदत करणाऱ्या बँका टिकतील, असे कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शनिवारी (दि. २०) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ३८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री थोरात बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, उद्योजक राजेश मालपाणी, साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, साहेबराव गडाख, संपत डोंगरे, विष्णुपंत रहाटळ, चंद्रकांत कडलग, राजेंद्र गुंजाळ, रमेश गुंजाळ, सुलभा दिघे, सुनीता अभंग, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, बँकेचे शाखाधिकारी रमेश थोरात, आदी उपस्थित होते.

अमृतवाहिनी बँकेने आर्थिक शिस्त कायम जपली आहे. या बँकेवर सभासद व नागरिकांचा मोठा विश्वास असून बँकेमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था भक्कम झाली आहे. कोरोना संकटामुळे कर्जदारांकडे बँकांची कर्जे बाकी आहेत. मात्र, आता प्रत्येकाने थोडे-थोडे करीत थकबाकी नियमित केली पाहिजे, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले.

नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे संचालक सुभाष गुंजाळ, गोरक्षनाथ सोनवणे, निसार शेख, नानासाहेब शिंदे, आर. बी. रहाणे, बापूसाहेब गिरी, बाळासाहेब फड, लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, रोहिदास पवार, बाळासाहेब उंबरकर, शंकरराव ढमक, लक्ष्मण वाघ यावेळी उपस्थित होते.

----------

Web Title: ... Only then will the banks that help you survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.