संस्कृत राजकारणीच शिक्षकांचा आदर करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST2021-08-12T04:24:59+5:302021-08-12T04:24:59+5:30

नगर तालुका गुरुकुल व शिक्षक समितीच्या वतीने सभापती, उपसभापती, नवनिर्वाचित सदस्य, गुणवंत शिक्षक व विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित करण्यात ...

Only Sanskrit politicians respect teachers | संस्कृत राजकारणीच शिक्षकांचा आदर करतो

संस्कृत राजकारणीच शिक्षकांचा आदर करतो

नगर तालुका गुरुकुल व शिक्षक समितीच्या वतीने सभापती, उपसभापती, नवनिर्वाचित सदस्य, गुणवंत शिक्षक व विद्यार्थी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. राज्य उपाध्यक्ष रा.या. औटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ.दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर, शिक्षक नेते व साहित्यिक डॉ.संजय कळमकर, नगर तालुका शिवसेना नेते संदीप गुंड, जिवाजी लगड, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, राजेंद्र ठाणगे, सूर्यभान काळे, बाळासाहेब गारगुंड, भिवसेन चत्तर, मधुकर मैड, दत्ता जाधव, ऋषी गोरे, दस्तगीर शेख, राजेंद्र खडके, शरद धलपे, अशोक कुटे आदी उपस्थित होते.

नगर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष मधुकर मैड यांनी प्रास्ताविक केले. केडगाव बीटला नव्याने हजर झालेल्या शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला साठे, तसेच पुरस्कारप्राप्त शिक्षक अशोक कुटे, विजय महामुनी, शरद धलपे आणि गुणवंत विद्यार्थी प्रणाली कडूस, संस्कृती ढगे, संस्कृती कुलांगे, समृद्धी नवले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दत्तनगर (वाकोडी, ता.नगर) शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका ज्योती नागवडे यांनी लिहिलेल्या ‘भारत देश : राष्ट्रीय प्रतिके, मानचिन्हे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी अतुल वडे, चंद्रकांत मंडलिक, नीलेश तोडमल, प्रमोद घोडके, युवराज गारुडकर, आजीनाथ पांढरे, मंगल अष्टेकर, ज्योती नागवडे, रूपाली कर्डिले, रुकीया तांबोळी, लीना पाटील, मंगल ढगे, सुरेखा नाईक, सावता बनकर, प्रवीण थोरात, बबलू काळोखे, मच्छींद्र जावळे, दिलीप बेरड, संदीप बोठे, अजय भद्रे, ईश्वर नागवडे, दीपक साळवे, गणेश कुलांगे, संतोष ढगे, सुभाष धामणे आदींनी परिश्रम घेतले. नगर तालुका गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी स्वागत केले. आभार प्रदर्शन ज्येष्ठ मार्गदर्शक भिवसेन चत्तर यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब नगरे यांनी केले.

...............

१० गुरुकूल

Web Title: Only Sanskrit politicians respect teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.