आजपासून ऑनलाइन बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:46+5:302021-07-20T04:16:46+5:30
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांचे ...

आजपासून ऑनलाइन बदल्या
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांचे वेळापत्रक शुक्रवारी (दि.१६) जाहीर केले होते, परंतु त्यात सार्वजनिक सुट्ट्यांचा विचार न केल्याने सोमवारी पुन्हा या वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाच्या स्थितीमुळे तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येण्याची गरज नाही. त्यांचे समुपदेशन झूम ॲपवर होणार आहे. त्यामुळे त्यांना पंचायत समिती कार्यालयात बसूनच बदली प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून मिळाली.
-------------
‘लोकमत’ने दिले होते वृत्त
आधीच्या वेळापत्रकात बकरी ईद (दि.२१) व रविवार (दि.२५) या सुट्ट्यांच्या दिवशीही बदल्या ठेवल्या होत्या. बकरी ईद या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बदल्या ठेवल्याने काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त होती. याबाबत ‘लोकमत’नेही दि. १८ रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर, सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाने या सुट्ट्या वगळून बदल्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले.
------------
सुधारित वेळापत्रक असे :
दि. २० जुलै. १० ते १२ सामान्य प्रशासन
१२.३० ते २.३० अर्थ विभाग
२.३० नंतर कृषी विभाग
दि. २२ १० ते ११ लघू पाटबंधारे
११ ते १२ ग्रामीण पाणीपुरवठा
१२ नंतर पशुसंवर्धन
दि. २४ १० ते १ प्राथमिक शिक्षण
२ ते ६ आरोग्य विभाग
दि.२६ १० ते २ ग्रामपंचायत
२.३० ते ३.३० महिला बालकल्याण
दि. २७ १० ते ६ आरोग्य विभाग
दि. २८ १० ते ४ शिपाई संवर्ग