कोपरगाव पीपल्स बँकेची ऑनलाइन सभा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:20 IST2021-04-02T04:20:05+5:302021-04-02T04:20:05+5:30
कोपरगाव : कोपरगाव पीपल्स बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी बँकेच्या सभागृहात ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या ...

कोपरगाव पीपल्स बँकेची ऑनलाइन सभा संपन्न
कोपरगाव : कोपरगाव पीपल्स बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी बँकेच्या सभागृहात ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अतुल काले होते.
यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा प्रतीभा शिलेदार, संचालक रतनचंद ठोळे, कैलासचंद ठोळे, विजय कोठारी, सुनील कांगले, रवींद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, राजेंद्र सिंगी, वसंत आव्हाड, यशवंत आबनावे, सत्यम मुंदडा, सुनील बंब, रवींद्र ठोळे, हेमंत बोरावके, प्रभावती पांडे, संजय भोकरे, प्रसन्ना काला, वीरेश पैठणकर, अशोक पापडीवाल यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक एकबोटे उपस्थित होते. यावेळी ऑनलाइन सभेत मोठ्या संख्येने सभासद सहभागी झाले होते. सभेप्रसंगी वीरेश पैठणकर यांनी बँकेच्या मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले, तर वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर व्यास यांनी आभार मानले.