ओंकार थेरपीचे तज्ज्ञ डॉ. जयंत करंदीकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 17:40 IST2017-12-03T17:40:01+5:302017-12-03T17:40:31+5:30
फिजिशियन, ओंकार थेरपी तज्ज्ञ, संगीतप्रेमी, कुष्ठरुग्णसेवक डॉ. जयंत करंदीकर (वय ७३) यांचे रविवारी दुपारी निधन झाले.

ओंकार थेरपीचे तज्ज्ञ डॉ. जयंत करंदीकर यांचे निधन
अहमदनगर: येथील प्रतिथयश फिजिशियन, ओंकार थेरपी तज्ज्ञ, संगीतप्रेमी, कुष्ठरुग्णसेवक डॉ. जयंत करंदीकर (वय ७३) यांचे रविवारी दुपारी निधन झाले. शहरातील सर्वात जुन्या बालिकाश्रम संस्थेचे प्रमुख, बालसदन या संस्थेचे मार्गदर्शक होते. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. औरंगाबाद रोडवरील पिंपळगाव माळवी परिसरात त्यांचे ओंकार थेरपी केंद्र होते. तेथे राज्याच्या विविध भागातून लोक उपचारासाठी यायचे.