शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशाच्या कांद्याने केला वांदा; भाव पडले

By शिवाजी पवार | Updated: November 24, 2022 12:32 IST

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये बुधवारी उन्हाळ कांदा दरात घसरण झाली आहे.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दहा दिवसांपूर्वी ३० रुपये किलोवर असलेले कांद्याचे दर कोसळले आहेत. मध्य प्रदेशामधील जुन्या कांद्याची विक्री अद्यापही उत्तर भारतातील बाजारामध्ये होत आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये नगर व नाशिक जिल्ह्यातील कांद्याची विक्री बंद झाली आहे. पुढील काळात दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे.बुधवारी कांद्याला १० ते १६ रुपये किलोपर्यंत दर मिळाले. जुना साठवण कांदा नोव्हेंबरपर्यंत संपुष्टात येतो. यंदा मात्र, अजूनही ३० टक्के माल शिल्लक राहिल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच आता लाल कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कांदा मोठ्या प्रमाणावर येऊन दरात घट होईल. मध्य प्रदेशमध्ये कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा येथील बाजारपेठेत तो कांदा टिकून आहे. तुलनेत मध्य प्रदेशाचा कांदा दोन ते चार रुपये स्वस्त मिळतो. श्रीरामपूर येथील कांदा उत्तर भारत व दक्षिण भारतामध्ये समसमान विक्री होतो. आता मात्र, उत्तरेमध्ये केवळ १० टक्के माल रवाना होतो, अशी माहिती व्यापारी जितेंद्र गदिया यांनी ‘लोकमत’ला दिली. 

बांगलादेश भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश होता. त्यानंतर श्रीलंकेचा समावेश होता. आता बांगलादेशमध्ये कांदा उत्पादन होत आहे, तसेच तेथे निर्बंध आहेत. श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीत गेला आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिक व नगर जिल्ह्यातील कांद्यासाठी चांगले चित्र नाही.    - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती.

उन्हाळ कांदा घसरलानाशिक जिल्ह्यातील लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये बुधवारी उन्हाळ कांदा दरात घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत ५०० ते १८०० रुपये तर उमराणे बाजार समितीत ७०० ते १४०० रुपये भाव मिळाला. गेल्या सात महिन्यांपासून भाववाढीच्या अपेक्षेने राखून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याचे दर निम्म्याने घसरल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. 

टॅग्स :onionकांदाMadhya Pradeshमध्य प्रदेशNashikनाशिकFarmerशेतकरी