पारनेरमध्ये कांदा आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:44 IST2016-10-29T00:13:33+5:302016-10-29T00:44:20+5:30
पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सुमारे सात हजार कांदा गोण्यांची आवक झाल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.

पारनेरमध्ये कांदा आवक
पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी सुमारे सात हजार कांदा गोण्यांची आवक झाल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.
कांद्याला क्विंटलमागे दोनशे ते आठशे रूपये भाव मिळाला. दरम्यान दिवाळीनिमित्त कांदा खरेदी विक्री व्यवहार बंद राहणार आहेत. बाजार समितीत गेल्या दोन आठवड्यांपासून कांदा आवकमध्ये वाढ होत असून बुधवारी पाच ते सात हजार व शुक्रवारी सात हजार कांदा गोण्यांची आवक झाल्याचे सभापती गायकवाड यांनी सांगितले. लहान कांद्याला दोनशे ते तीनशे, मध्यम कांद्याला तीनशे ते पाचशे व चांगल्या कांद्याला पाचशे ते आठशे रूपये क्विंटलमागे भाव मिळाल्याचे उपसभापती विलास झावरे, सचिव शिवाजी पानसरे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात अपुरा पाउस झाला असला तरी कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले आहे. मात्र देशपातळीवर कांदा भावात चढउतार होत असून शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी क्विंटलमागे शंभर रूपये अनुदान देण्याची मागणी सभापती गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)