एकाच रात्री १६ दुकाने फोडली

By Admin | Updated: July 12, 2014 01:10 IST2014-07-11T23:26:29+5:302014-07-12T01:10:49+5:30

श्रीगोंदा : काष्टीतील नगर-दौंड रोडवरील बाजार समिती शॉपिंग सेंटर व एस.पी. डेव्हलपर्समधील १६ दुकानांचे शटर्स उचकटून चोरट्यांनी एकाच रात्री सुमारे १० हजाराची रोकड व दुकानातील वस्तू लंपास केल्या.

On one night, 16 shops were closed | एकाच रात्री १६ दुकाने फोडली

एकाच रात्री १६ दुकाने फोडली

श्रीगोंदा : काष्टीतील नगर-दौंड रोडवरील बाजार समिती शॉपिंग सेंटर व एस.पी. डेव्हलपर्समधील १६ दुकानांचे शटर्स उचकटून चोरट्यांनी एकाच रात्री सुमारे १० हजाराची रोकड व दुकानातील वस्तू लंपास केल्या. विशेष म्हणजे पोलीस चौकी शेजारीच असणारी दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत़ ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली़
बाजारपेठेतील विक्रम राजेंद्र पाचपुते यांच्या दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातून ८ हजारांची तर बाबासाहेब गोयकर यांच्या दुकानातून २ हजार रुपयांची रोकड चोरली. तसेच मधुकर काळाणे, कालीदास नलगे, कपील काकुलते, रवींद्र क्षीरसागर, शाम तावरे, अजय चव्हाण, सोमनाथ थोरात, शंकर जगताप, रमेश भुजबळ, दत्तात्रय हजारे यांच्या दुकानाचेही शटर्स तोडून नुकसान केले. अनेकांच्या दुकानातील विविध वस्तू चोरट्यांनी लांबविल्या असून, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे़ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मनतोडे, सहाय्यक फौजदार अशोक उकिर्डे, पो.कॉ. जितेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामे केले.
दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे सर्व व्यावसायिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत चोरट्यांनी एकाच रात्री १६ दुकानांचे शटर तोडले. त्यामुळे व्यापारी वर्गाच्या समस्यांमध्ये अधिक भर पडली आहे़ बाजार समिती व एस.पी. डेव्हलपर्स शॉपिंग सेंटर परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य असते. या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ही दुकाने फोडली़ त्यामुळे येथे दिवे लावण्याची मागणी होत आहे़ शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांना कोणताही तपास लागू शकला नव्हता़ (तालुका प्रतिनिधी)
पोलीस चौकी हुकली
बाजार समिती शॉपिंग सेंटरमधील पोलीस चौकीच्या शेजारील दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटले.
मात्र पोलीस चौकीचे शटर उचकटले नाही़ त्यामुळे पोलिसांची अब्रू वाचली, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली़

Web Title: On one night, 16 shops were closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.