एक कोटीचे बनावट मद्य जप्त

By Admin | Updated: July 11, 2014 00:57 IST2014-07-11T00:40:21+5:302014-07-11T00:57:02+5:30

संगमनेर : मध्यप्रदेशमधून थेट श्रीरामपुरात होणाऱ्या बनावट मद्य विक्रीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने भांडाफोड केला

One million fake liquor seized | एक कोटीचे बनावट मद्य जप्त

एक कोटीचे बनावट मद्य जप्त

संगमनेर : मध्यप्रदेशमधून थेट श्रीरामपुरात होणाऱ्या बनावट मद्य विक्रीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने भांडाफोड केला असून, दोन परप्रांतीय ट्रकसह २ हजार खोक्यातील कोट्यवधी रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली.
जिल्ह्यातील श्रीरामपूर हे बनावट मद्य विक्रीसाठी प्रसिध्द आहे. श्रीरामपुरात मध्यप्रदेश, दमण, सिल्व्हासा, गोवा आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी मद्य येते. दरम्यान गुरूवारी पहाटे मध्यप्रदेशहून बनावट मद्य घेवून दोन ट्रक तळेगाव दिघेमार्गे श्रीरामपुरात येत असल्याची गुप्त खबर मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचे निरीक्षक मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक एस. एन. तोतरे, व्ही. टी. व्यवहारे, रामकिसन खेडकर, जवान हिम्मत जाधव, के. के. शेख, सुधीर नागरे यांच्या पथकाने संगमनेर-तळेगाव दिघे रस्त्यावर सापळा लावला. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिगाव शिवारातील हॉटेल अर्चना ढाब्याजवळ दोन ट्रक (एच.आर.६३, बी.१४६३ व एच.आर.४६, सी.१९४३) येवून थांबले. घट्ट ताडपत्री बांधलेल्या ट्रकची पथकाने झाडाझडती घेतली असता त्यात आजूबाजूने सलाईन व मध्यभागी बनावट देशी-विदेशी मद्याचे खोके भरलेले असल्याचे आढळून आले. चव्हाण यांनी ट्रक चालक केदारसिंग गंगाराम शिसोदिया (वय ३०), हकीमखान इद्रीसखान (वय २७) व अबीदखान छित्तरखान (वय ४५, सर्व रा. सारनपूर, राजगड, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. मद्याने भरलेले ट्रक उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर कार्यालयात आणून खाली केले. दोन्ही ट्रकमध्ये बनावट मद्याचे २ हजार व सलाईनचे ४०० खोके सापडले असून त्यांची अंदाजे किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची ही पहिलीच
घटना आहे. (प्रतिनिधी)
संगमनेर राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी जीप चालविणारा जवान आर. एम. डमरे हा जणू आपणच ‘साहेब’ आहोत, अशी शेखी मिरवत होता. कोठे काय चालते? याची इत्यंभूत माहिती असताना मात्र या प्रकरणात त्याने चुप्पी साधल्याने हा विषय चर्चेला बनला.

Web Title: One million fake liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.