श्रीरामपूर नेवासे मार्गावर अपघातात एक ठार; दोघे जखमी
By शिवाजी पवार | Updated: June 20, 2023 17:03 IST2023-06-20T17:02:47+5:302023-06-20T17:03:02+5:30
निपाणी वाडगाव येथील उत्तम अर्जुन दौंड यांचा अपघातात मृत्यू झाला.

श्रीरामपूर नेवासे मार्गावर अपघातात एक ठार; दोघे जखमी
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर नेवासा मार्गावर अशोकनगर फाटा येथे मंगळवारी दुपारी दोन दुचाकीची समोरासमोर सधडक झाली. यात एका जणाचा मृत्यू झाला. अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील साखर कामगार होणार आहेत उपचार सुरू आहेत.
निपाणी वाडगाव येथील उत्तम अर्जुन दौंड यांचा अपघातात मृत्यू झाला. घटनास्थळी नागरिकांनी मदतकार्य राबवले. शहर पोलिसांनाही त्याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जखमींना साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले. यातील दौंड यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा रुग्णालय उपचारासाठी हलवण्यात आले. तेथे यांचा मृत्यू झाला. दोघा जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.