कारच्या धडकेने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:53 IST2021-01-13T04:53:01+5:302021-01-13T04:53:01+5:30

या अपघातात तात्याराम हरिभाऊ कोठुळे (वय ५७, रा.दत्त मळा, खडकी) हे मयत झाले आहेत. रविवारी (दि.१०) रात्री पावणेनऊच्या सुमारास ...

One killed in car crash | कारच्या धडकेने एकाचा मृत्यू

कारच्या धडकेने एकाचा मृत्यू

या अपघातात तात्याराम हरिभाऊ कोठुळे (वय ५७, रा.दत्त मळा, खडकी) हे मयत झाले आहेत. रविवारी (दि.१०) रात्री पावणेनऊच्या सुमारास कोठुळे हे मोटारसायकलवरून खडकी गावाकडून दत्त मळ्याकडे येत होते. यावेळी कारने (क्र. एमएच १६, बीक्यू ००९०) त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघातानंतर कारचालक अरुण देवीदास पवार (रा. बुरूडगाव रोड) हा वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी प्रवीण तात्याराम कोठुळे (२४) याने कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.११) सायंकाळी फिर्याद दिली. तालुका पोलिसांनी संशयित कारचालक अरुण पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयत तात्याराम कोठुळे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, ३ मुली, आई-वडील, असा परिवार आहे.

...

१२तात्याराम कोठुळे

Web Title: One killed in car crash