कार-दुचाकी अपघातात १ ठार, दोघे गंभीर जखमी

By Admin | Updated: September 3, 2014 23:59 IST2014-09-03T23:38:31+5:302014-09-03T23:59:35+5:30

श्रीगोंदा : खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार व दोन मोटारसायकल यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

One killed and two seriously injured in a car-bike accident | कार-दुचाकी अपघातात १ ठार, दोघे गंभीर जखमी

कार-दुचाकी अपघातात १ ठार, दोघे गंभीर जखमी

श्रीगोंदा : खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार व दोन मोटारसायकल यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. नगर-दौंड मार्गावरील लोणीव्यंकनाथ शिवारात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.
शकीलभाई शेख (वय २४, रा. दौंड) यांचा मृतामध्ये तर जखमींमध्ये आबा लाटे (रा. लोणीव्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. अन्य एका जखमीचे नाव समजले नाही.
कारची धडक
कार बेलवंडीहून लोणीकडे जात होती. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दोन मोटारसायकलींना कारने जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवरील एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले.
नगर -दौंड मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने तालुक्यातून चिंता व्यक्त होत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: One killed and two seriously injured in a car-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.