केडगावच्या एकाचा सोनेवाडी रस्त्यावर अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:19+5:302021-02-05T06:34:19+5:30

केडगाव : केडगावच्या भूषणनगर येथील रहिवासी संजय महादेव बोडखे (वय ४०) यांचा रविवारी (दि.३१) रात्री ९ च्या सुमारास केडगाव-सोनेवाडी ...

One from Kedgaon died in an accident on Sonewadi road | केडगावच्या एकाचा सोनेवाडी रस्त्यावर अपघाती मृत्यू

केडगावच्या एकाचा सोनेवाडी रस्त्यावर अपघाती मृत्यू

केडगाव : केडगावच्या भूषणनगर येथील रहिवासी संजय महादेव बोडखे (वय ४०) यांचा रविवारी (दि.३१) रात्री ९ च्या सुमारास केडगाव-सोनेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

संजय बोडखे हे श्रीराम फायनान्स कंपनीमध्ये वसुली अधीक्षक या पदावर कार्यरत होते. कंपनीच्या कामानिमित्ताने रविवारी सायंकाळी ते सोनेवाडी येथे गेले होते. तेथून परतत असताना लोंढे मळ्याच्या पुढे महावितरण कंपनीच्या उपकेंद्रासमोर केडगावहून अकोळनेरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, आई, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. बोडखे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१) सकाळी केडगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

फोटो : ०१ संजय बोडखे

Web Title: One from Kedgaon died in an accident on Sonewadi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.