म्हस्के विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:17+5:302021-07-20T04:16:17+5:30
निंबळक : जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव-ने संचलित नागापूर (नगर) येथील काकासाहेब म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा ...

म्हस्के विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल
निंबळक : जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव-ने संचलित नागापूर (नगर) येथील काकासाहेब म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातील एकूण १०२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. विशेष योग्यता श्रेणीत ११ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम यश चांदर (९७.६० टक्के), द्वितीय भूमिका बोडखे (९६.८० टक्के),
तृतीय चेतना गार्डी (९४.४० टक्के) गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक यांचे कौतुक संस्था अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जि. प. अध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या शीतल बांगर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुनंदा धामणे यांनी केले.