निघोज, पिंपरी जलसेन गावात शंभर टक्के लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 20:22 IST2020-05-14T20:22:18+5:302020-05-14T20:22:28+5:30
पारनेर/ निघोज : येथील रहिवासी असलेला व पिंपरी जलसेनच्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने निघोज आणि पिंपरी जलसेन ही दोन्ही गावे शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आली आहेत. सध्या या भागात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, रहदारी बंद करण्यात आली आहे.

निघोज, पिंपरी जलसेन गावात शंभर टक्के लॉकडाऊन
पारनेर/ निघोज : येथील रहिवासी असलेला व पिंपरी जलसेनच्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने निघोज आणि पिंपरी जलसेन ही दोन्ही गावे शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आली आहेत. सध्या या भागात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, रहदारी बंद करण्यात आली आहे.
तसेच या गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधिताच्या मृत्युमुळे प्रशासन व तालुका हादरला आहे. गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, सरपंच ठकाराम लंके यांनी निघोज, पिंपरी जलसेन येथे लॉकडाऊनचा आढावा घेतला. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. निघोज, पिंपरी जलसेन येथील अनेक कुटुंब, संपकार्तील व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पती-पत्नी, दोन चिमुकल्यांना बरोबर घेऊन लॉकडाऊनचा नियम मोडून घाटकोपर येथून पिंपरी जलसेनला आले. तेथे शाळेत क्वारंटाईन होण्याऐवजी घरी जाऊन बसले. कोरोनासारखी लक्षणे असतानाही सरकारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी उशीर केला. कोरोनाबाबत काळजी घेण्याऐवजी स्वत:चा आणि कुटुंबियांच्या निष्काळजीपणामुळेच त्या कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाल्याचा घटनाक्रमच आता समोर आला आहे.
-------
अनेकांच्या जीवाला घोर
पिंपरी जलसेनच्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता पिंपरी जलसेनमधील त्याचे जवळचे दहा नातेवाईक, निघोज येथील डॉक्टर, पठारवाडीतील आत्या, पिकअपचा चालक, दोन मोटारसायकलस्वार व या सर्वांचे कुटुंब, मित्र परिवार यांची साखळी आता शोधून काढण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आणि अनेकांच्या जिवाला घोर लागला आहे.