कालव्याच्या पाण्यात एकाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:50+5:302021-04-19T04:18:50+5:30

केशव मंजाहरी काळे (वय ७५, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव आहे. काळे यांची वस्ती कालव्याच्या कडेला आहे. ...

One drowned in canal water | कालव्याच्या पाण्यात एकाचा बुडून मृत्यू

कालव्याच्या पाण्यात एकाचा बुडून मृत्यू

केशव मंजाहरी काळे (वय ७५, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव आहे. काळे यांची वस्ती कालव्याच्या कडेला आहे. त्यांना दृष्टिदोष होता. दुपारी घरातून बाहेर पडल्यावर ते नाहीसे झाले होते. दुपारी दोन वाजल्यापासून त्यांचे नातेवाईक शोध घेत होते. गुरुवारी (ता. १५) सकाळी सहा वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. शनिवारी (सकाळी) कालव्यातून अडीचशे क्यूसेकने पाणी सुरू होते. काळे पाय घसरून कालव्यात पडल्याच्या संशय नातेवाइकांना होता. अखेर संशय खरा ठरला. रात्री साडेआठ वाजता त्यांचा मृतदेह येवले आखाडा येथे पाण्यातून बाहेर काढण्यात आला. काळे यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. गजानन काळे यांचे ते वडील होत.

Web Title: One drowned in canal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.