नगर-दौंड महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:27 IST2021-02-05T06:27:16+5:302021-02-05T06:27:16+5:30

श्रीगोंदा : नगर- दौंड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगावच्या शिवारात मंगळवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार व ढंपरची समोरासमोर ...

One died in an accident on Nagar-Daund highway | नगर-दौंड महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

नगर-दौंड महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

श्रीगोंदा : नगर- दौंड राष्ट्रीय महामार्गावर मढेवडगावच्या शिवारात मंगळवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार व ढंपरची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच मृत्युमुखी पडला. हा ढंपर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा होता.

सिकंदरभाई पठाण (वय ४५, रा. म्हातारपिंप्री, श्रीगोंदा), असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नगर-दौंड मार्गावरून नगरहून दौंडच्या दिशेने ढंपर निघाला होता. मढेवडगाव शिवारात भरधाव ढंपरने पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमाेर धडक झाली. अपघातानंतर ढंपरचालक पळून गेला. दुचाकीस्वार लांब उडून काही अंतर मागे पडला व जागीच मृत्युमुखी पडला. अपघातामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ रोखली गेली होती. हेड कॉन्स्टेबल मनोहर किसन गावडे अपघातस्थळी दाखल झाले.

Web Title: One died in an accident on Nagar-Daund highway