वर्षा गंगुले झाल्या एक दिवसाच्या नगराध्यक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:34+5:302021-03-09T04:22:34+5:30

कोपरगाव : नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी (दि.८) जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा ...

One day mayor after Varsha Ganguly | वर्षा गंगुले झाल्या एक दिवसाच्या नगराध्यक्षा

वर्षा गंगुले झाल्या एक दिवसाच्या नगराध्यक्षा

कोपरगाव : नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी (दि.८) जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा हिरामण गंगुले यांच्याकडे एक दिवसाचा नगराध्यक्षपदाचा पदभार सुपुर्द केला होता.

यावेळी वहाडणे म्हणाले, प्रत्येकाने आधी स्वत:च्या घरातील महिला, कामवाली, धुणे भांडे करणाऱ्या, स्वच्छता कामगार यांच्याशी सन्मानपूर्वक वागावे व नंतर जागतिक महिला दिन साजरा करावा. राजमाता जिजाऊ माता, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचे गुणगान करणाऱ्या समाजात महिलांचे शोषण, बलात्कार होणे दुर्दैवीच आहे. मागील वर्षीही नगरसेविका ताराबाई जपे यांना दोन दिवसांच्या नगराध्यक्षपदाचा वहाडणे यांनी मान दिला होता.

यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, जेष्ठ नगरसेवक भाजप गटनेते रवींद्र पाठक, राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके, शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल, मंदार पहाडे, नगरसेविका माधवी वाकचौरे, वर्षा शिंगाडे, हर्षा कांबळे, सुवर्णा सोनवणे, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, मेहमूद सय्यद, सुनील गंगुले, सर्व महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सर्व महिला नगरसेविका, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

.............

Web Title: One day mayor after Varsha Ganguly