पैशाच्या वादातून एकाचा खून

By Admin | Updated: April 22, 2017 20:59 IST2017-04-22T20:59:30+5:302017-04-22T20:59:30+5:30

पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद होऊन दारूच्या नशेत दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना आश्वी खुर्द ते शेडगाव रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

One blood donor money | पैशाच्या वादातून एकाचा खून

पैशाच्या वादातून एकाचा खून

आॅनलाइन लोकमत
आश्वी (अहमदनगर), दि़ २२ - पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद होऊन दारूच्या नशेत दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना आश्वी खुर्द ते शेडगाव रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. खुनाच्या घटनेनंतर चोवीस तासांच्या आत गुन्ह्याचा तपास करीत आश्वी पोलिसांनी आरोपी किरण हसवराज वाघ यास अटक केली आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याचा सुमारास आश्वी खुर्द ते शेडगाव रस्त्यावर सात चारी परिसरात सुरेश विठ्ठल गायकवाड यांच्या गट नंबर ३२६ मधील उसाच्या शेतात दगडाने ठेचून खून केलेला पुरुष जातीचा मृतदेह मजुरी करणाऱ्या महिलांना आढळून आला. याबाबतची माहिती आश्वी पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश कमाले, हे.कॉ. एकनाथ बव, तात्याराव वाघमारे,भारत जाधव, अनिल शेगाळ, पांडुरंग कावरे, कैलास ठोंबरे, मच्छिंद्र शिरसाठ व अहमदनगर श्वान पथकाचे निरीक्षक एस.डी.बावले, आर. आर. वीरकर श्वास पथकासह दाखल झाले.
पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता मयत तरुण आदिवासी समाजाचा दीपक रावसाहेब जाधव (वय २८,रा.पाचेगाव, ता. नेवासा) येथील रहिवासी असून, गेल्या दोन वर्षापासून तो शेडगाव (ता. संगमनेर) येथे शेतमजुरीचे काम करत येथील जालिंदर सदाशिव सांगळे यांच्या शेतात राहत असल्याचे समजले. त्यानंतर शुक्रवारी रात्री बारा वाजण्याचा सुमारास त्याच्या घरी जाऊन पत्नीस विचारपूस केली असता तिने पती मजुरीचे पैसे आणण्यासाठी जातो,असे गेले असून अद्याप घरी आले नाहीत, असे सांगितले. तिला मयत दीपक याचे प्रेत दाखविले असता ते पतीचे असल्याचे तिने ओळखले. नंतर तिची तसेच नातेवाईकांकडे चौकशी करत काही संशयितांना पोलिसांंनी ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच आरोपी किरण हसवराज वाघ याने दुपारी तीन वाजण्याचा सुमारास आश्वीहून शेडगावकडे जात असताना दारूच्या नशेत पैशाच्या हिशोबावरुन भांडणे झाली. यावेळी मोठा दगड उचलून दीपकच्या डोक्यात टाकून खून केला. त्यानंतर घरी जाऊन आंघोळ करून कपडे पेटीत लपवून ठेवले असल्याचे आरोपी वाघ याने सांगितले. त्यानंतर आरोपीने पोलिसांना पेटीतील रक्ताने भरलेले कपडे काढून दिले. आरोपी किरण वाघ हा मयत दीपक जाधव याची पत्नी अनिता हिचा चुलत भाऊ आहे.

Web Title: One blood donor money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.