आत्महत्याप्रकरणी एकास अटक

By Admin | Updated: October 19, 2016 01:05 IST2016-10-19T00:47:30+5:302016-10-19T01:05:34+5:30

मिरजगाव : निमगाव गांगर्डा (ता. कर्जत) येथील अंकुश भानुदास राऊत (वय ५६ ) या शेतकऱ्याने रविवारी केलेल्या आत्महत्याप्रकरणी पोपट नाथू राऊत यांस पोलिसांनी अटक केली

One arrested for suicides | आत्महत्याप्रकरणी एकास अटक

आत्महत्याप्रकरणी एकास अटक


मिरजगाव : निमगाव गांगर्डा (ता. कर्जत) येथील अंकुश भानुदास राऊत (वय ५६ ) या शेतकऱ्याने रविवारी केलेल्या आत्महत्याप्रकरणी पोपट नाथू राऊत यांस पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण नाथू राऊत, माणिक नाथू राऊत, वैभव लक्ष्मण राऊत हे तिघेही घटनेनंतर फरार आहेत.
मृताची पत्नी समाबाई यांच्या फिर्यादीनुसार आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या चार आरोपींविरुद्ध मंगळवारी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ही अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस दूरक्षेत्राचे निरीक्षक शिवाजी गवारे, फौजदार प्रमोद भिंगारे, हेडकाँस्टेबल सुरेश बाबर, नरसिंह शेलार, काँस्टेबल संतोष साबळे, गोकुळ इंगवले घटनास्थळी पोहोचले. पण ही आत्महत्या नसून घातपात आहे, असा आरोप होता.

Web Title: One arrested for suicides