घर घर लंगर सेवेच्या कोविड सेंटरमध्ये दीड हजार रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:21+5:302021-06-26T04:16:21+5:30
घर घर लंगर सेवेच्या वतीने महापालिकेच्या सहकार्याने हॉटेल नटराज व महिलांसाठी जैन पितळे वसतिगृह येथे निशुल्क कोविड सेंटर सुरु ...

घर घर लंगर सेवेच्या कोविड सेंटरमध्ये दीड हजार रुग्ण झाले बरे
घर घर लंगर सेवेच्या वतीने महापालिकेच्या सहकार्याने हॉटेल नटराज व महिलांसाठी जैन पितळे वसतिगृह येथे निशुल्क कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. आतापर्यंत हॉटेल नटराज येथून १ हजार ११ तर जैन पितळे येथून ५५०(महिला) असे एकूण १५६६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. रमेश कोठारी परिवार, शांतीबाई फिरोदिया मेमोरियल ट्रस्ट व आय लव्ह नगर यांनी दिलेल्या मदतीतून हे दोन्ही कोविड सेंटर कार्यरत करण्यात आले होते. सध्या दोन्ही कोविड सेंटर निशुल्क सेवा देत असून, कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्वरित कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती होण्याचे आवाहन लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन्ही कोविड सेंटर चालविण्यासाठी महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, विशाल ढुमे यांचेही सहकार्य मिळाले.