भातोडीत दीड लाखाचा ऐवज लांबवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:27 IST2021-02-27T04:27:57+5:302021-02-27T04:27:57+5:30
.............. लोणीत शेळ्यांची चोरी अहमदनगर : लोणी खुर्द (ता. राहाता) येथे १० हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या अज्ञात व्यक्तीने ...

भातोडीत दीड लाखाचा ऐवज लांबवला
..............
लोणीत शेळ्यांची चोरी
अहमदनगर : लोणी खुर्द (ता. राहाता) येथे १० हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली. सतीश प्रभाकर सोनवणे यांनी याबाबत लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २३ फेब्रुवारी रोजी सोनवणे यांच्या शेळ्या जुने पोस्ट ऑफिसजवळील त्यांच्या घरासमोर बांधलेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने या शेळ्या पळविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुरुवारी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
............
बसमध्ये चोरी, आराेपीस पकडले
अहमदनगर : येथील माळीवाडा बसस्थानकात पुणे-पाथर्डी बसमध्ये एका आरोपीस चोरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत अंबादास रोहिदास भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे, आरोपी शेख रऊफ कासम (वय ६०, रा. झेंडीगेट, नगर) यास भालेराव यांच्या खिशातून ४ हजार रुपयांची रक्कम चोरताना पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस ताब्यात घेतले.
............
पोखर्डीतून शेळीची चोरी
अहमदनगर : पोखर्डी (ता. नगर) येथे घरासमोर चरत असलेली ८ हजार रुपये किमतीची शेळी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत सुरेखा कैलास कुलथे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२५) फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस नाईक गांगर्डे करीत आहेत.
..........