तेलही गेले अन् तुपही...

By Admin | Updated: June 29, 2014 00:29 IST2014-06-28T23:49:43+5:302014-06-29T00:29:20+5:30

अहमदनगर : यंदा दहावीचा निकाल चांगला लागला. जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र अकरावीसाठी मुबलक जागा असल्याचे चित्र आहे.

Oil went away and ... | तेलही गेले अन् तुपही...

तेलही गेले अन् तुपही...

अहमदनगर : यंदा दहावीचा निकाल चांगला लागला. जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र अकरावीसाठी मुबलक जागा असल्याचे चित्र आहे. मात्र, विशिष्ट शाखेतून विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या नादात अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी प्रवेश अर्ज घेतले नसल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे पाच ते दहा टक्केपर्यंत या विद्यार्थ्यांची संख्या असून त्याला महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दुजोरा दिला आहे.
दहावीचा निकाल १७ जूनला जाहीर झाला. त्यानंतर १९ ते २६ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज घेण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिले होते. मात्र, शहराबाहेरून येणारे विद्यार्थी, विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आमूक महाविद्यालयात, तमुक महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा यावर चर्चा करता करताच प्रवेश अर्ज घेण्याचा कालावधी संपला आहे.
आता हे विद्यार्थी आणि पालक शहरातील महाविद्यालयात प्रवेश अर्जासाठी चकरा मारताना दिसत आहे. जामखेड येथील असे पालक त्यांच्या मुलीसोबत नगरमधील एका नामवंत महाविद्यालयात आले होते. संबंधीत मुलीला ८१ टक्के गुण मिळालेले असून तीला मुलींचे निवासी वस्तीगृह असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र, कोठे प्रवेश घ्यावा, यावर चर्चा करण्यात प्रवेशाचा कालावधी उलटला आहे. आता या विद्यार्थिनीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता या विद्यार्थ्यांना कसा प्रवेश द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधीत पालक आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून शिक्षण विभागाचा रस्ता दाखविण्यात आलेला आहे. शहरात अनेक महाविद्यायात असे उशीर झालेले विद्यार्थी प्रवेश अर्जासाठी चकरा मारत आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
शिक्षण विभागाने सूचना देऊनही शहरातील अनेक महाविद्यालयांनी प्रवेश अर्जाच्या नावाखाली ५० ते १२० रुपये उकळले आहेत. सुरूवातील शिक्षण विभागाने त्याकडे कानाडोळा केला. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांतून ओरड झाल्यानंतर सर्वच महाविद्यालयांना नोटीस पाठविण्याची जजुबी कारवाई केलेली आहे. तयातून गोंधळ चव्हाट्यावर आला.
(प्रतिनिधी)
अकरावी प्रवेशासाठी शहर आणि जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजला सूचना देण्यात आलेल्या आहे. कोणत्याही परिस्थितीत या ज्युनिअर कॉलेजला अतिरिक्त जागांसाठी परवानगी देण्यात येणार नाही.
-परशुराम पावसे,
प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी

Web Title: Oil went away and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.