गुजरातच्या शनीभक्ताकडून १९ लाखाचा कलश शनी चरणी अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 18:55 IST2018-05-23T18:54:21+5:302018-05-23T18:55:29+5:30
अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचांदीचा कलश शनी चरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोनं व ४ हजार २९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश अर्पण करण्यात आला आहे.

गुजरातच्या शनीभक्ताकडून १९ लाखाचा कलश शनी चरणी अर्पण
नेवासा : अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोन्याचांदीचा कलश शनी चरणी अर्पण करण्यात आला. ५१० ग्रॅम सोनं व ४ हजार २९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश अर्पण करण्यात आला आहे. या भक्ताने आपले नाव सांगितले नाही. सायंकाळच्या महाआरती नंतर हा कलश चवथ्या-यावर लावण्यात आला. या शनी भक्ताचा शनैश्वर देवस्थानच्या वतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी जनसंपर्क कार्यालयात सन्मान केला.
यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्वस्त रावसाहेब बानकर, भागवत बानकर, दीपक दरंदले, उप कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले उपस्थित होते.