देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट,लोणी पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 21:04 IST2020-04-30T21:03:54+5:302020-04-30T21:04:02+5:30
लोणी : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोका होईल, अशा प्रकारची टिपण्णी फेसबुकवर टाकल्याच्या विरोधात लोणी पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट,लोणी पोलिसात तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोका होईल, अशा प्रकारची टिपण्णी फेसबुकवर टाकल्याच्या विरोधात लोणी पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय सोपानराव आहेर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. दिलीप बोचे यांच्या विरोधात ही तक्रार आहे. बोचे यांनी फेसबुक युजर अकाऊंटद्वारे विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशी आक्षेपार्ह, अपमानास्पद व बदनामी करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट केली आहे. या प्रकरणी दिलीप बोचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जात पुराव्यांसह करण्यात आली आहे.