डॉक्टरने केले महिला रुग्णांचे अश्लील चित्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:54 IST2018-07-04T12:54:08+5:302018-07-04T12:54:33+5:30

वैैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या गरोदर स्त्रियांच्या गुप्तांगाचे एका डॉक्टरने छायाचित्रण केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी श्रीरामपुरात उघडकीस आला.

Obscene depictions of female doctor made by doctors | डॉक्टरने केले महिला रुग्णांचे अश्लील चित्रण

डॉक्टरने केले महिला रुग्णांचे अश्लील चित्रण

श्रीरामपूर : वैैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या गरोदर स्त्रियांच्या गुप्तांगाचे एका डॉक्टरने छायाचित्रण केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी श्रीरामपुरात उघडकीस आला. एका पीडित महिलेने पोलीस उपाधीक्षकांना निनावी पत्र व सीडी दिल्याने या कृत्याला वाच्यता फुटली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच डॉक्टरने या प्रकाराची कबुली दिली आहे. या प्रकरणी शहरातील डॉ. योजित संजीव बार्से (वय २५, रा. सुभाष कॉलनी) यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांनी सांगितले, की एका महिलेने निनावी पत्र व सीडी पाठविली आहे. संबंधित डॉक्टरने दहा महिलांच्या गुप्तांगांचे चित्रण केले आहे. या डॉक्टरने तपासणीच्या बहाण्याने महिला रुग्णांना अश्लील स्पर्श केले. त्याने यापूर्वी शहरातील दोन ते तीन रुग्णालयांमध्ये काम केले. मात्र हे चित्रण कोणत्या रुग्णालयातील आहे, हे अद्याप स्पष्ट होत नाही, असे वाघचौरे म्हणाले. सोमवारी दिवसभर त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Obscene depictions of female doctor made by doctors