कर्जत तहसीलवर ओबीसींचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:39+5:302021-06-29T04:15:39+5:30
कर्जत : राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सावता परिषदेच्या वतीने कर्जत तहसीलवर सोमवारी सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला. ...

कर्जत तहसीलवर ओबीसींचा मूक मोर्चा
कर्जत : राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सावता परिषदेच्या वतीने कर्जत तहसीलवर सोमवारी सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना सावता परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षणाच्या याचिकेवरून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत ग्रामपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी राखीव असलेले आरक्षण रद्द केले आहे. यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला धक्का बसला आहे. केंद्र व राज्य सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालून ओबीसी समाजाला आरक्षण पूर्ववत कसे मिळेल याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी यांनी दिला.
यावेळी सावता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब धोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष सुमित राऊत, माजी सरपंच संतोष म्हेत्रे, ॲड. हरिश्चंद्र राऊत, माउली सायकर, राहुल खराडे, सचिन सोनमाळी, गोदड सोनमाळी, राम शिंदे, अनिल अनारसे, पुष्पा शिंदे, सपना सोनमाळी, सुवर्णा राऊत, सुवर्णा शिंदे आदी उपस्थित होते.
---
२८ कर्जत मोर्चा
ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना देताना सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी व इतर.