ओबीसीचे पूर्वीप्रमाणेच आरक्षण कायम ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:55+5:302021-07-11T04:15:55+5:30
कोपरगाव : ओबीसी समाजासाठीचे आरक्षण कायम ठेवावे, त्यासाठी स्वतंत्र जनगणनेची आवश्यकता नसून के. कृपण मूर्त्ती यांनी दिलेल्या आदेशात परिच्छेद ...

ओबीसीचे पूर्वीप्रमाणेच आरक्षण कायम ठेवावे
कोपरगाव : ओबीसी समाजासाठीचे आरक्षण कायम ठेवावे, त्यासाठी स्वतंत्र जनगणनेची आवश्यकता नसून के. कृपण मूर्त्ती यांनी दिलेल्या आदेशात परिच्छेद क्रमांक ४८ मध्ये कन्क्लुजन ३ मध्ये इम्पिरिकल डाटा सादर करणे. हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे. त्याप्रमाणे हे आरक्षण कायम ठेवावे, या मागणीचे निवेदन माळी बोर्डिंगचे अध्यक्ष अनिल पांढरे यांच्यासह तालुक्यातील सर्व ओबीसी समाजाच्या अध्यक्षांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले आहे.
पांढरे म्हणाले, प्रत्येक सामाजिक कार्यात ओबीसी समाजाचे योगदान मोठे आहे. त्यांच्यावर अशा प्रकारे वार करून त्यांचे आरक्षण काढून घेतले तर स्थानिक स्वराज्य संस्थासह अन्य ठिकाणी या समाजाची मोठी गळचेपी होईल. परिणामी सामाजिक शांतता धोक्यात येऊन नाईलाजास्तव ओबीसी समाजाला आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल. ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेऊन शासनाने यावर मध्यस्थ म्हणून तोडगा काढावा व वर्षानुवर्षे सुरू असलेले आरक्षण कायम ठेवावे, असे ओबीसी समाजाच्या सर्व अध्यक्षांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रवींद्र पाठक, प्रभाकर शिंदे, मच्छिंद्र केकाण, अशोक लकारे, राजेंद्र गंगुले, मुकुंद काळे, अशोक माळवदे, शेखर बॊरावके, डाॅ. मनोज भुजबळ , किरण सुपेकर, संतोश वढणे, विशाल राउत, प्रदीप नवले , वैभव गिरमे, नगरसेवक शिवाजी खांडेकर, विजय ओढणे, राहुल आघाडे यांच्यासह सर्व समाजाचे अध्यक्ष व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.