सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:21 IST2021-05-19T04:21:49+5:302021-05-19T04:21:49+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ३,१५६ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, तर नव्या २,१६१ बाधितांची रुग्णसंख्येत ...

सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ३,१५६ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, तर नव्या २,१६१ बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या निम्यावर कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नगर शहरातील रुग्णांची संख्याही दीडशेच्या आत आली आहे.
जिल्ह्यात ३,१५६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने, आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार ३४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत २,१६१ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९ हजार ३९ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २६८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६९४ आणि अँटिजन चाचणीत १,१९९ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर २५, जामखेड २, कर्जत ३१, कोपरगाव ७३, नगर ग्रामीण ४१, नेवासा १, पारनेर २, पाथर्डी १, राहता ४, राहुरी ५०, संगमनेर १, शेवगाव १, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर २ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ७६, अकोले १५, जामखेड ७१, कर्जत १०, कोपरगाव ४, नगर ग्रामीण ३२, नेवासा १२५, पारनेर २५, पाथर्डी ५८, राहाता ३०, राहुरी ५, संगमनेर ५४, शेवगाव ६६, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ७७, कंटोन्मेंट बोर्ड ३ आणि इतर जिल्हा ३१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज १,१९९ जण बाधित आढळुन आले. नगर शहर ३०, अकोले ९५, जामखेड १२, कर्जत ९३, कोपरगाव ५२, नगर ग्रा. ५८, नेवासा १७०, पारनेर १३७, पाथर्डी १२१, राहाता ६४, राहुरी १०६, संगमनेर ५९, शेवगाव ४६, श्रीगोंदा ८१, श्रीरामपूर ६४ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गत २४ तासांत जिल्ह्यात २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,१४,३४६
उपचार सुरू असलेले रुग्ण : १९,०३९
मृत्यू : २,५१६
एकूण रुग्णसंख्या : २,३५,९०१