पारनेरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:25 IST2021-08-13T04:25:22+5:302021-08-13T04:25:22+5:30
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या शंभराच्या आत आली असून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र वाढलेलीच आहे. सर्वाधिक संगमनेर तालुक्यात १२३ ...

पारनेरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटली
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या शंभराच्या आत आली असून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र वाढलेलीच आहे. सर्वाधिक संगमनेर तालुक्यात १२३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी जिल्ह्यात तब्बल ८५२ रुग्णांची भर पडली आहे. सध्या आता ५ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८१ आणि अँटिजेन चाचणीत ३४९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (१२३), पारनेर (८२), श्रीगोंदा (८१), अकोले (६७), नगर ग्रामीण (६०), कर्जत (५७), शेवगाव (५६), जामखेड (५४), पाथर्डी (५४), राहुरी (५०), राहाता (४०), श्रीरामपूर (३४), नगर शहर (३१), कोपरगाव (२६), नेवासा (२६), इतर जिल्हा (१६) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पारनेर तालुक्यात ९ ऑगस्टला ९७, १० ऑगस्टला ४४, ११ ऑगस्टला १३३, तर १२ ऑगस्टला ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पारनेरची संख्या आता शंभराच्या आत आली आहे.
------------
दोन दिवसांत ३३ मृत्यूंची नोंद
जिल्ह्यात दोन दिवसांत ३३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ११ ऑगस्टला २०, तर १२ ऑगस्टला १३ जणांच्या मृत्यूची पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या ६३४७ इतकी झाली आहे.
---------
कोरोनास्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,९७,१२६
उपचार सुरू असलेले रुग्ण : ५३८७
पोर्टलवरील मृत्युनोंद : ६३४७
एकूण रुग्णसंख्या : ३,०८,८६०
-------------