कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा पाचशेच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:15 IST2021-07-10T04:15:40+5:302021-07-10T04:15:40+5:30
दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी ४६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या दाेन लाख ७५ हजार ३०६ ...

कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा पाचशेच्यावर
दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी ४६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या दाेन लाख ७५ हजार ३०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, एकूण रुग्णांची संख्या आता दोन हजार ७४२ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६१ आणि अँटिजन चाचणीत २४० रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, जामखेड १२, कोपरगाव १, नगर ग्रा. ७, नेवासा १, पारनेर ७, पाथर्डी ७, राहुरी ४, संगमनेर ११, श्रीगोंदा ६ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ९, अकोले ६, जामखेड ६, कर्जत ६, कोपरगाव ५, नगर ग्रा. १४, नेवासा २६, पारनेर ३०, पाथर्डी ३१, राहाता १४, राहुरी २१, संगमनेर २६, शेवगाव २३, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज २४० जण बाधित आढळले. मनपा २, अकोले १४, जामखेड १९, कर्जत १, कोपरगाव १६, नगर ग्रा. २४, नेवासा १३, पारनेर ४७, पाथर्डी १२, राहाता १२, राहुरी ८, संगमनेर २३, शेवगाव ११, श्रीगोंदा ३२ आणि श्रीरामपूर सहा अशा रुग्णांचा समावेश आहे.
--------------
बरे झालेली रुग्णसंख्या : २,७५,३०६
उपचार सुरू असलेले रुग्ण : २७४२
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५९७५
एकूण रुग्णसंख्या : २,८४,०२३