ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:57+5:302021-02-15T04:19:57+5:30
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ८०० ते ९०० पर्यंत खाली आली होती. तसेच दररोज ...

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढली
अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ८०० ते ९०० पर्यंत खाली आली होती. तसेच दररोज सरासरी ६०-७० बाधित रुग्ण आढळून यायचे. हा आकडा शंभरच्यापुढे जात असल्याने उपचार घेणाऱ्या (ॲक्टिव्ह) रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ही संख्या रविवारी ११६० इतकी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत असल्याने अनेकजण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे गेल्या आठ दिवसांमध्ये कमी झालेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसते आहे. त्यात काहीवेळा बरे होऊन घरी जाणाऱ्यांपेक्षा बाधित रुग्णांचीच संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. रोज सरासरी ६० ते ७० रुग्ण बाधित यायचे, ते आता पुन्हा ही संख्या शंभरापर्यंत वाढली आहे.
जिल्ह्यात रविवारी १०१ बाधित रुग्णांची वाढ झाली, तर ७६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ३४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४८ आणि अँटीजेन चाचणीत १२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (४०), अकोले (४), जामखेड (२), कोपरगाव (६), नगर ग्रामीण (१०), पाथर्डी (५), संगमनेर (१३), शेवगाव (२), नेवासा (१), पारनेर (५), राहाता (५), राहुरी (५), श्रीरामपूर (३), श्रीगोंदा (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
---------
जिल्ह्यातील कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : ७१३४७
उपचार सुरू असलेले रुग्ण : ११६०
मृत्यू :१११५
एकूण रुग्ण संख्या : ७३६२२
--------
अशी वाढली ॲक्टिव्ह रुग्ण संख्या
दिनांक ॲक्टिव्ह रुग्ण
७ फेब्रुवारी १०६६
८ फेब्रुवारी १०९१
९ फेब्रुवारी १०३२
१० फेब्रुवारी १०५०
११ फेब्रुवारी ११०७
१२ फेब्रुवारी ११४१
१३ फेब्रुवारी ११३५
१४ फेब्रुवारी ११६०
२ फेब्रुवारी ९६३