आता बनावट रेमडेसिविर तयार करून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:12+5:302021-04-21T04:21:12+5:30
पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी शेख याने सर्व माहिती दिली. डॉक्टर इंजेक्शन वापरुन कचरा डब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या इंजेक्शनमध्ये सलाईन ...

आता बनावट रेमडेसिविर तयार करून विक्री
पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी शेख याने सर्व माहिती दिली. डॉक्टर इंजेक्शन वापरुन कचरा डब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या इंजेक्शनमध्ये सलाईन मधील पाणी भरुन तो विकायचा. रईस विरुद्ध दौलत उर्फ भक्ती काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे. रईस याने किती बनावट इंजेक्शन विकले व त्यामुळे पेशंट दगावले का? याचा पोलीस तपास करत आहेत. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना हा प्रकार समजला.
आरोपीस न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे करीत आहेत.
कोरोनाचे सावट शहरात व श्रीरामपूर तालुक्यात वाढले असताना रुग्णांना रेमडेसिविरची गरज भासत आहे. हे इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने रुग्णांचे नातेवाईक वणवण फिरत आहेत. त्यातच फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत.
-------------