आता थेट दुकानात धान्य

By Admin | Updated: July 14, 2014 00:58 IST2014-07-14T00:34:00+5:302014-07-14T00:58:33+5:30

श्रीरामपूर : स्वस्त धान्य दुकानदार हा समाजाचा जबाबदार घटक असून तो शिधावाटप पत्रिका धारकास रॉकेलचे वितरण वेळेवर करुन एक प्रकारे सामाजिक काम करीत असतो़

Now grains in live shops | आता थेट दुकानात धान्य

आता थेट दुकानात धान्य

श्रीरामपूर : स्वस्त धान्य दुकानदार हा समाजाचा जबाबदार घटक असून तो शिधावाटप पत्रिका धारकास रॉकेलचे वितरण वेळेवर करुन एक प्रकारे सामाजिक काम करीत असतो़ स्वस्त धान्य दुकानदारास लवकरच शासकीय वाहनातून थेट दुकानात धान्य वितरीत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी केले.
श्रीरामपूर येथे जिल्हा पुरवठा विभाग व स्वस्त धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेते संघ यांच्या संयुक्तीक विद्यमाने मार्गदर्शन कार्याशाळा रविवारी झाली़ या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कासार म्हणाले, वितरण व्यवस्थेबाबत सर्व माहिती वेबसार्ईटवर उपलब्ध आहे. तेथून माहिती घ्यावी. कार्ड धारकांनी दुकानदारांना विनाकारण त्रास देवु नये. जोपर्यंत पुरवठा विभागाचे अधिकारी सांगत नाही़ तोपर्यंत पोलिसांनी हस्पक्षेप करु नये. व दुकानदारांना त्रास देवु नये. लेव्ही साखरेचा प्रश्न या महिन्या आखेर निकाली निघेल. अन्न सुरक्षा योजनेत सत्तर टक्के जनतेला लाभ दिला जात असुन अद्याप १ लाख लाभार्थी निवडणे बाकी आहे. पाच लाभार्थींना त्याचा लाभ देण्यात येर्ईल. पुरवठा विभागाचे काम हे पारदर्शक राहील. पंधरा वर्षापुर्वी दिलेल्या शिधा पत्रिका बदलण्यासाठी नावे कमी करणे, नविन नाव दाखल करणे यासाठी जिल्ह्यात कॅम्प सुरु असल्याचे त्यांनी सांगितले़
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, राज्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डी. एन.पाटील, सचिव विजय पंडीत, कोषाध्यक्ष प्रभाकर पाडळे, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव अरुणकाका हिरडे, जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास देसाई, सचिव मुंकूद सोनटक्के, सहसचिव रज्जाक पठाण, प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत झुरंगे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील धान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांच्या मुलांनी शैक्षणिक व विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल सत्कार करण्यात आला. राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अरुण हिरडे यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला़ यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरचे तालुकाध्यक्ष ए. एन. देशमुख, गंगापुरचे तालुकाध्यक्ष एन. बी. मनाळ, सिल्लोडचे अध्यक्ष पठाण, राहुरीचे तालुकाध्यक्ष रावसाहेब भगत, शेवगावचे बाबासाहेब कराड, संगमनेरचे संजय टांगरे, अकोलाचे गणपतराव भांगरे, नेवासाचे सुरेश उभेदळ, कर्जतचे प्रकाश भोसले, पी.एस.पाटील, भारत ढाकणे, राधेशाम कळंकाय, सलीम बेग आदी उपस्थित होते. देविदास देसाई यांनी प्रास्ताविक केले. रज्जाक पठाण यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत झुरंगे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)

Web Title: Now grains in live shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.