सहा वर्षांपासून फरार असलेले कुख्यात दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:21 IST2021-05-23T04:21:04+5:302021-05-23T04:21:04+5:30
अशोक कागद चव्हाण, भाऊसाहेब कागद चव्हाण (रा. दोघे हिंगणी, ता. कोपरगाव), परमेश्वर बाबासाहेब काळे (राजुरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), ...

सहा वर्षांपासून फरार असलेले कुख्यात दरोडेखोर जेरबंद
अशोक कागद चव्हाण, भाऊसाहेब कागद चव्हाण (रा. दोघे हिंगणी, ता. कोपरगाव), परमेश्वर बाबासाहेब काळे (राजुरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), जिभाऊ गजानन काळे (वडगाव, ता. गंगापूर), देवगन कागद चव्हाण, बाबूल कागद चव्हाण, कागद मारुती चव्हाण, बेबो कागद चव्हाण (सर्व रा. हिंगणी) व मिजेश निजाम काळे (रा. रांजणगाव, ता. गंगापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक तलवार, लोखंडी कत्ती, सुरी, लाकडी दांडे, मोबाईल असा एकूण ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात कोपरगाव, सिलेगाव, विरगाव, वैजापूर, वाळुंज आदी पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या सहा वर्षांपासून हे आरोपी दरोडेखोर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.