शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड अझहर शेख अखेर जेरबंद; मध्यप्रदेशमधील खेड्यात लपला होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 16:16 IST

नगर शहरातील कुख्यात गुंड व उद्योजक करीम हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमार्इंड अझहर मंजूर शेख याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील पिंपरवाणी खवासा या खेडेगावात राहत होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.

अहमदनगर : नगर शहरातील कुख्यात गुंड व उद्योजक करीम हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमार्इंड अझहर मंजूर शेख याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. तो मध्यप्रदेश राज्यातील पिंपरवाणी खवासा या खेडेगावात राहत होता. पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेतले.अझहर व त्याच्या साथीदारांनी येथील उद्योजक अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) यांचे १८ नोव्हेंबर २०१९ रोजी नगर शहरातून अपहरण केले होते. अपहरणानंतर हुंडेकरी यांना जालना येथे नेऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते़ या घटनेनंतर पोलिसांनी अझहर व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला होता. घटनेच्या दोन दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अझहरचा साथीदार निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. अझहर मात्र पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की, अझहर हा मध्यप्रेदश राज्यातील शिवनी या खेड्यात आहे. माहितीनुसार सहायक निरिक्षक शिषीरकुमार देशमुख, हेड कॉस्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक संतोष लोढे, दीपक शिंदे, रविंद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, मच्छिंद्र बर्डे, सागर ससाणे, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके यांच्या पथकाने शिवनी परिसरात जाऊन माहिती घेतली़. पिंपरवाणी हे गाव पेंच अभयारण्य परिसरात असल्याने अझहर हा दिवसभर जंगलात जाऊन राहत होता. रात्री तो गावात येत असे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वेशांतर करून दोन दिवस सापळा लावून अझहरला अटक केली़. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अझहर याच्यावर गंभीर स्वरुपाचे १४ गुन्हे अझहर शेख याच्यावर कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, संगमनेर आदी पोलीस ठाण्यात खून, दरोडा, मारहाण, विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट असे गंभीर स्वरुपाचे चौदा गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस