सागर शेजवळ खून प्रकरणातील कुख्यात आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:23 IST2021-02-09T04:23:32+5:302021-02-09T04:23:32+5:30

कोते व त्याच्या साथीदारांनी ३० डिसेंबर २०२० रोजी शिर्डी येथून राजेंद्र लालजीभाई भंडारी यांचे अपहरण करून मारहाण करीत त्यांच्याकडील ...

Notorious accused in Sagar Shejwal murder case arrested | सागर शेजवळ खून प्रकरणातील कुख्यात आरोपी जेरबंद

सागर शेजवळ खून प्रकरणातील कुख्यात आरोपी जेरबंद

कोते व त्याच्या साथीदारांनी ३० डिसेंबर २०२० रोजी शिर्डी येथून राजेंद्र लालजीभाई भंडारी यांचे अपहरण करून मारहाण करीत त्यांच्याकडील २७ हजार हिसकावून घेतले होते. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस नाईक विशाल दळवी, सुरेश माळी, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे आदींच्या पथकाने कोते याला धुळे परिसरातून ताब्यात घेतले. कोते याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

----------

कोरोना रजेवरून आल्यानंतर केला गंभीर गुन्हा

विशाल कोते हा सागर शेजवळ खून खटल्यात २०१५ पासून जेलमध्ये होता. कोरोनाकाळात त्याला रजा देण्यात आली होती. शिर्डीत येताच त्याने पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला. याप्रकरणी पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

Web Title: Notorious accused in Sagar Shejwal murder case arrested