पारदर्शक कारभाराच्या शिंगणापूर ट्रस्टला सूचना

By Admin | Updated: December 16, 2015 23:06 IST2015-12-16T22:31:51+5:302015-12-16T23:06:59+5:30

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टबाबत भाविकांच्या तक्रारींनंतर धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानला कारभारात पारदर्शकता आणण्याची सूचना केली आहे़

Notice to Transparent Trust Shinganapur Trust | पारदर्शक कारभाराच्या शिंगणापूर ट्रस्टला सूचना

पारदर्शक कारभाराच्या शिंगणापूर ट्रस्टला सूचना

सोनई : शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टबाबत भाविकांच्या तक्रारींनंतर धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानला कारभारात पारदर्शकता आणण्याची सूचना केली आहे़ कर्मचारी भरती विहित पद्धतीनेच व पारदर्शी व्हावी, खर्चाचा ताळेबंद विहित नमुन्यातच सादर करण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना नगरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ट्रस्टला दिल्या आहेत़
सोनई आणि शिंगणापूर येथील काही स्थानिकांसह भाविकांनी देवस्थानच्या कारभाराविषयी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने देवस्थानला नुकतेच पत्र पाठविले आहे. चौकशी संदर्भ क्र. ५७/२०१५ या पत्रानुसार शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने कंपोस्ट खत खर्च व कमर्चारी मजुरी, प्राथमिक शाळा ते चौफुला रस्ता खर्च, सत्कार खर्च, मूर्ती खर्च आदी सोशल व चॅरीटेबल नसलेले खर्च ताळेबंदात दाखविले असून यापुढे त्या-त्या वर्गवारीनुसारच खर्च दाखविण्याची दक्षता घेण्यात यावी, त्याचप्रमाणे ७.५. २०१० व ५.३.२०११ च्या आदेशानुसार महसूल व वनविभागाने पानसनाला नदीपात्रात विकासासाठी परवाना दिलेला आहे़ ६ हेक्टर ५९ आऱ ही जमीन १० वर्षांसाठी १ रुपया प्रतिवर्ष भाडेपट्ट्याने वापरण्यासाठी मंजुरी दिलेली दिसून येते व त्यावर न्यासाने भाविकांसाठी सुशोभिकरणाचा खर्च केल्याचे दिसून येते़ त्यामुळे ट्रस्टने सुशोभिकरण केलेल्या जागेची नोंद न्यासाचे परिशिष्ट-१ वर घ्यावी, त्यासाठी बदल अर्ज करून धर्मादाय कार्यालयात नोंदणी करण्याविषयी या पत्रात मार्गदर्शन करण्यात आले आहे़ तसेच पानसनाला सुशोभिकरणाचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे व खर्च वाढणार नाही, याची दक्षता घेण्याविषयी सूचना दिली आहे़ कर्मचारी भरती करताना सर्व पदांच्या भरतीच्या जाहिराती वृत्तपत्रात देऊनच भरतीची विहित पद्धत निश्चित करून पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबवावी, देवस्थानच्या दैनंदिन कारभारामध्ये पारदर्शकता व सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करावी, असे या पत्रात म्हटले आहे़ या पत्रातील मार्गदर्शन व सूचनांचे पालन करुन त्याचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.

Web Title: Notice to Transparent Trust Shinganapur Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.