टपरी मार्केट मालकांना नोटिसा, मनपात सुनावणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:23+5:302021-07-23T04:14:23+5:30
अहमदनगर : महापालिकेकडून विनापरवाना टपरी मार्केटच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यावर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ...

टपरी मार्केट मालकांना नोटिसा, मनपात सुनावणी सुरू
अहमदनगर : महापालिकेकडून विनापरवाना टपरी मार्केटच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यावर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी गुरुवारी ६४ जणांनी उपायुक्तांसमोर म्हणणे मांडले आहे. उर्वरित सुनावण्या शुक्रवारी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहर व परिसरातील रस्त्यांच्या बाजूला पत्र्याचे शेड उभारून टपरी मार्केट उभारण्यात आले आहेत. या शेडच्या पत्र्याला महापालिकेची परवानगी नाही. महापालिकेने मध्यंतरी टपरी मार्केटचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील ६२२ टपरी मार्केट मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यावर टपरी मालकांना म्हणने मांडण्याची संधी देण्यात आली आहे. उपायुक्त यशवंत डांगे यांच्यासमोर टपरी मार्केटबाबत सुनावण्या सुरू असून, सुनावणीचा गुरुवारी पहिला दिवस होता. टपरी मार्केटसाठी परवानगी घेतली गेली नाही. परवानगीसाठी मुदत वाढवून देण्याची टपरी मार्केट मालकांची मागणी आहे. परंतु, महापालिका कारवाईवर ठाम असून, टपरी मार्केटवर हातोडा चालविला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
....
अनधिकृत टपरी मार्केट हटविणार
शहर व परिसरात टपरी मार्केट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे गाळे विनावापर पडून आहेत. पत्र्याच्या शेडमधील गाळे कमी भांडवलात उभे राहतात. त्यामुळे पत्र्याचे शेड उभारण्यात येत असून, हे गाळे भाड्याने दिले जात आहेत. परंतु, या कारवाईमुळे छोटे व्यावसायिक अडचणीत येणार आहेत.
...
अनधिकृत टपरी मार्केट मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी ६४ टपरी मार्केट मालकांनी म्हणणे मांडले. उर्वरित सुनावणी शुक्रवार, आणि सोमवारी घेण्यात येणार आहेत.
- यशवंत डांगे, उपायुक्त, महापालिका
...
सूचना: फोटो २२ टपरी मार्केट नावाने आहे.