शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जेऊर हैबती येथील मयत व्यक्तीला बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील बेकायदा गोैण खनिज उत्खनन व वाहतूक केल्या प्रकरणी नेवाशाच्या महसूल यंत्रणेने या ...

कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील बेकायदा गोैण खनिज उत्खनन व वाहतूक केल्या प्रकरणी नेवाशाच्या महसूल यंत्रणेने या प्रकरणात महिनाभरापूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला नोटीस बजावली आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेकडून गौण खनिज चोरी प्रकरणी चौकशी व त्यानंतरही कारवाईच संशयास्पद ठरू लागली आहे.

जेऊर हैबती येथील काही ग्रामस्थांनी येथीलच रामबाबा देवस्थानच्या परिसरातील शासकीय जागेतील मुरूम व माती असे गौण खनिज चोरी झाले, अशी लेखी तक्रार २३ जून रोजी माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांनी नेवासा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन तहसीलदारांनी कुकाणा मंडलाधिकाऱ्यांना जागेची पाहणी व पंचनामा करून अहवाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कुकाणा मंडलाधिकाऱ्यांनी २९ जून २०२१ रोजी उत्खननाचा पंचनामा करून त्याचा अहवाल नेवासा तहसीलदारांना सादर केला होता. त्यानुसार तहसीलदारांनी यातील संबंधित व्यक्ती अकबर बाबुभाई सय्यद (रा. जेऊर हैबती, ता. नेवासा) यांना ३० जून २०२१ रोजी खुलासा नोटीस बजावली. मात्र त्यांचा ६ जून २०२१ रोजीच मृत्यू झालेला आहे. कुकाणा मंडल अधिकाऱ्यांनी २९ जून रोजी पंचनामा करून अहवाल सादर केला. मंडल अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ३० जून २०२१ रोजी तहसीलदारांनी ही नोटीस बजावली. नोटीस बजावलेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जवळपास महिन्याचा कालावधी उलटला असतानाही त्याच व्यक्तीला नोटीस बजावणे म्हणजे अजबच प्रकार आहे.

---

तहसीलदार

तक्रार अर्ज व पंचनाम्यामध्ये नाव असल्याने त्या व्यक्तीच्या नावे नोटीस काढण्यात आली होती. जोपर्यंत मृत्यूची नोंद होत नाही, तोपर्यंत त्याच व्यक्तीच्या नावे नोटीस काढण्यात येते. जेऊरच्या तलाठ्याने संबंधित व्यक्ती मयत असून त्याच्या वारसाला (मुलाला) ७ जुलै रोजी नोटीस बजावण्यात आल्याचा अहवाल तलाठ्याने सादर केलेला आहे.

रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, नेवासा

----

येथील श्री रामबाबा मंदिर परिसरातील १५० ते २०० ब्रास मातीचे अवैध उत्खनन झाले. त्याबाबत नेवासा तहसीलदारांना संबंधित व्यक्तींची नावे दिलेली आहेत. अकरापैकी फक्त एकाच मयत व्यक्तीला नोटीस बजावण्यात आलेली आहे. इतर व्यक्तींना नोटीस बजावण्यात यावी, अन्यथा गावबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांनी दिला.