उमेदवारीसह दिग्गज मैदानात

By Admin | Updated: September 26, 2014 00:18 IST2014-09-26T00:07:02+5:302014-09-26T00:18:03+5:30

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर शहरासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली़

With the nomination, in the legendary field | उमेदवारीसह दिग्गज मैदानात

उमेदवारीसह दिग्गज मैदानात

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर शहरासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली़ आघाडी व महायुतीच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता दिग्गजांनी अर्ज दाखल केले असून, जिल्ह्यात एकाच दिवशी २९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारी अर्जाची संख्या ३४ झाली आहे़
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ गेल्या शनिवारपासून ही प्रक्रिया सुरू आहे़ परंतु आघाडी व महायुतीचा निर्णय होत नसल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गजांनी अर्ज दाखल दाखल करणे टाळले होते़ त्यात पितृ पंधरवाडा सुरू असल्याने इच्छुक निवडणूक शाखेकडे फिरकले देखील नाहीत़ अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी घटस्थापनेचाच मुहूर्त काढला असल्याची चर्चा होती़ त्यामुळे घटस्थापनेनंतर मोठ्या प्रमणात अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा होती़ अपेक्षेप्रमाणेच शहरासह जिल्ह्यातील सर्वच दिग्गज सकाळी अर्ज दाखल करण्यासाठी बाहेर पडले़ सकाळच्या सत्रात नगर शहर मतदारसंघातून सेनेकडून आमदार अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीकडून महापौर संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला़ पारंपरिक राजकीय विरोधक असलेले जगताप व राठोड यांनी एकापाठोपाठ अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली असून, काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांनीदेखील नामनिर्देशनपत्र घेतले आहे. याशिवाय भाजपाच्या वतीने माजी नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी तर अपक्ष उबेद शेख यांनीही अर्ज दाखले केले आहेत़ युतीची घोषणा झाली नसतानाही लोंढे यांनी भाजपाकडून अर्ज दाखलकेला़ शहरातून अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या पाच झाली आहे़
जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि भाजपाच्या विद्यमान आमदारांनी अर्ज दाखल केले़ संगमनेर मतदारसंघातून महसूलमंत्री विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांनी दोन अर्ज दाखल केले़ शिर्डी मतदारसंघातून कृषिमंत्री राधाकृष्ण एकनाथ विखे पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले़ श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपाकडून तीन अर्ज दाखल केले असून, अकोले मतदारसंघातून पालकमंत्री मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ तसेच शेवगाव पाथर्डी- चंद्रशेखर घुले, नेवासा-शंकरराव गडाख आणि पारनेर मदारसंघातून विजय औटी यांनी अर्ज दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)
संदीप कोतकरांनी घेतले अर्ज
काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांनीही चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत़ शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणात संदीप कोतकर यांना जिल्हाबंदी आहे़ असे असताना संदीप कोतकर यांनी अर्ज घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कोतकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
सत्यजित तांबे यांनी घेतला अर्ज
आघाडीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी नगर शहर मतदारसंघातून काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र तयारी सुरू केली आहे़ काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या ११८ उमेदवारांच्या यादीत नगर शहरातून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचेही नाव जाहीर झाले आहे़ तांबे यांनी सकाळी चार नामनिर्देशनपत्र घेतले़ तर राष्ट्रवादीचे महापौर जगताप यांनी अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतली आहे़ याशिवाय भाजपाकडून बाबासाहेब वाकळे ,सेनेचे आ.अनिल राठोड, डॉ़ भरत ढोकणे, अनिल पवार, बसपाकडून अशोक सोनवणे, वैभव शिंदे यांनी अर्ज घतले आहेत़
सर्वसामान्यांना त्रास
नगर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सावेडी उपनगरातील नगर तहसील कार्यालयात राबविली जात आहे़ अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी वेग आला़ घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार असल्याने सकाळपासूनच प्रोफेसर चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता़ त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला़ त्यात पोलिसांकडून मध्येच अडविले जात होते़ कोणतीही माहिती न देता वाहने अडविली गेल्याने नागरिक व पोलिसांत बाचाबाचीही झाली़

Web Title: With the nomination, in the legendary field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.