शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडापेक्षा कोणीही मोठा नाही - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:02 IST

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळून केली.

पाथर्डी : आपण इमानदारीची लढाई लढत असून ती शेवटपर्यंत लढणार आहे. सत्ता अस्थिर असते. धार्मिक व्यासपीठाचा वापर कोणीही राजकारणासाठी करू नये. राजकारण करायला अनेक जागा आहेत. हरिनाम सप्ताहात जयजयकाराच्या घोषणा ऐकून घेत स्वत:ला मिरवून घेणे मला आवडत नाही. कोणत्याही गडापेक्षा आपण मोठे नसतो हे समजणे गरजेचे आहे, अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळून केली.चुंबळी (ता. पाथर्डी) येथे सुरू असलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला मुंडे गुरुवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. मुंडे म्हणाले, गेल्या १४ वर्षांपासून संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी पूजन करण्याचा मान मला महंतांकडून मिळत आहे. गहिनीनाथ गडाने मला मोठे केले. त्याची उतराई होणे शक्य नाही. आपल्या माणसांसाठी शक्ती मिळो, अशी मागणी मी करीत आहे. सध्या होत असलेले हरिनाम सप्ताहही पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली आहे. शेतक-यांनी आता खंबीर व्हायला हवे. आपण सगळे मिळून जगण्याचा संघर्ष करू. त्यासाठी संत वामनभाऊ महाराज आपल्याला बळ देतील यावर विश्वास ठेवा असेही ते शेवटी म्हणाले.यावेळी गडाचे महंत विठ्ठल महाराज, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, ज्येष्ठ नेते दशरथ वणवे, राजेंद्र दौंड, माजी नगरसेवक चाँद मणियार, सीताराम बोरूडे, गहिनीनाथ शिरसाट, बाबासाहेब ढाकणे, बाळासाहेब दराडे उपस्थित होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAhmednagarअहमदनगरPankaja Mundeपंकजा मुंडे