कोरोनाचा सामना करताना कोणीही राजकारण करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:22+5:302021-06-02T04:17:22+5:30
सामाजिक अंतर ठेवत राजूर येथील दत्त मंदिरच्या प्रशस्त सभामंडपात पिचड यांचा ८१वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पिचड बोलत ...

कोरोनाचा सामना करताना कोणीही राजकारण करू नये
सामाजिक अंतर ठेवत राजूर येथील दत्त मंदिरच्या प्रशस्त सभामंडपात पिचड यांचा ८१वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पिचड बोलत होते.
यावेळी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे सचिव प्रा. एम. एम. भवारी, अध्यक्ष भरत घाणे, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, माजी आमदार वैभव पिचड, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, सरपंच गणपत देशमुख, माजी सरपंच संतोष बनसोडे, सुनील सारुक्ते उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार पिचड यांच्या हस्ते झाले. या शिबिरास तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभला. माजी मंत्री पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे डॉक्टर, इतर कर्मचारी आणि राजूर परिसरातील डॉक्टर, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी व पत्रकार यांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार करण्यात आला. उद्योजक नितीन गोडसे यांच्यातर्फे वाफेचे उपकरण देण्यात आले.
पिचड म्हणाले, आदिवासी खेड्यापाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. लस घ्यावी. लसीकरणाबाबत आदिवासी भागात अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणाची संख्या वाढवावी. आपण आणि आपले गाव, तालुका आणि राज्य कोरोना मुक्तीसाठी संकल्प करा. ग्रामपंचायत सदस्य भास्कर एलमामे यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी आभार मानले.