लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:40+5:302021-05-01T04:18:40+5:30
सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून त्यावेळी सर्वत्र गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता १ मे ...

लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये
सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून त्यावेळी सर्वत्र गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता १ मे पासून राज्य शासनाने १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ४५ वर्षांपुढील अनेक नागरिकांचे लसीकरण अद्यापही पूर्ण झाले नसून अनेकांना लसीचा दुसरा डोसही मिळालेला नाही. भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा मोठा असून लसीचे योग्य पद्धतीने वाटप न झाल्यास संगमनेर तालुक्यातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
२०११ साली जनगणना झाली होती. त्यावेळी तालुक्याच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यादृष्टीने सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यात १० आरोग्य केंद्र असून त्यास ६६ उपकेंद्र आहेत. त्याठिकाणी योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा करावा. योग्य पद्धतीने नियोजन करावे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.