म्हैसगाव सरपंचावरील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर
By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:04+5:302020-12-05T04:34:04+5:30
अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. सकाळी ...

म्हैसगाव सरपंचावरील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर
अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ग्रामसभेची कार्यवाही सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होती. ग्रामसभेसाठी १५२६ ग्रामस्थांनी उपस्थिती लावली. साडेदहा वाजता गुप्त मतदानाला सुरुवात झाली. तीन वाजेपर्यंत १४७९ एवढ्या ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी चार बुथची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामसभेसाठी महसूल व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. या कामकाजात तहसीलदार शेख यांना गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांनी सहाय्य केले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.