मनपाच्या गुड मॉर्र्निंग पथकाची ९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 13:42 IST2017-05-31T13:42:37+5:302017-05-31T13:42:37+5:30
महापालिकेच्या गुड मॉर्र्निग पथकाने शहरात उघड्यावर बसणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी सकाळी केलेल्या ८ जणांवर कारवाई करण्यात आली.

मनपाच्या गुड मॉर्र्निंग पथकाची ९ जणांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिकेच्या गुड मॉर्र्निग पथकाने शहरात उघड्यावर बसणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी सकाळी केलेल्या ८ जणांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारून तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करुन समज देऊन त्यांची सुटका करण्यात आली. सावेडी प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांच्या मार्ग्दर्शनखाली ही कारवाई करण्यात आली.
गुड मॉर्र्निग पथकाने सावेडी व बोल्हेगाव परिसरात कारवाई केली. त्यामध्ये ९ नागरिकांना उघड्यावर शौचास जाताना ताब्यात घेण्यात आले. ९ जणांकडून एकूण ४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कामगिरी पथकातील परिक्षित बिडकर, कुमार सारसर यांनी केली.