शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चक्कर कशामुळे आली?; खुद्द नितीन गडकरींनीच सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 14:35 IST

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ का आली?. यामागील कारण समोर आले आहे.

ठळक मुद्देदीक्षांत समारंभावेळी नितीन गडकरी यांना आली चक्करकॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्यांचा श्वास गुरमरला नितीन गडकरींची प्रकृती स्थिर

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ का आली?. यामागील कारण समोर आले आहे. दीक्षांत समारंभासाठी घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्यांचा श्वास गुरमरल्यासारखं झाले. यामुळेच भोवळ आली, अशी माहिती स्वतः नितीग गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान करावा लागतो. या पोशाखामुळे गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यातच हा समारंभ एका बंदिस्त सभागृहात झाल्याने त्यांचा श्वास गुदमरू लागला. श्वास गुदमरल्यानं भोवळ आल्याचे गडकरी यांनी सांगितले. यापूर्वीही, कॉन्व्होकेशन गाऊनमुळे असा प्रसंग एक-दोन वेळा घडल्याचंही त्यांनी सांगितले. दरम्यान, गडकरी यांचा रक्तदाब व साखर यावेळी नियमित होती, अशी माहिती समोर आली आहे. 

(राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात)

नेमके काय घडले?

दरम्यान, राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर नितीन गडकरींचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच गडकरी यांना विशेष विमानाने नागपूर येथे नेण्यात येणार आहे. 

नितीन गडकरींच्या प्रकृतीची विजय दर्डा यांनी केली विचारपूस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील कार्यक्रमात चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी नितीन गडकरी यांच्या प्रकृतीची फोन करून विचारपूस केली. यावेळी पदवीदान कार्यक्रमावेळी परिधान केलेला कॉन्व्होकेशन ड्रेस आणि तिथे मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी यामुळे चक्कर आल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच आपली प्रकृती आता स्थिर असल्याची  माहितीही त्यांनी दिली. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAhmednagarअहमदनगर