Nitin Gadkari health News | राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात
राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने नितीन गडकरी रुग्णालयात

ठळक मुद्देराहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरलेनितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे

राहुरी - राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान,  राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने त्यांना भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  


नितीन गडकरींच्या प्रकृतीची विजय दर्डा यांनी केली विचारपूस

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील कार्यक्रमात चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी नितीन गडकरी यांच्या प्रकृतीची फोन करून विचारपूस केली. यावेळी पदवीदान कार्यक्रमावेळी परिधान केलेला कॉन्व्होकेशन ड्रेस आणि तिथे मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी यामुळे चक्कर आल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच आपली प्रकृती आता स्थिर असल्याची  माहितीही त्यांनी दिली. 

English summary :
Nitin Gadkari Health News: Nitin Gadkari came to the graduation ceremony of Mahatma Phule Agricultural University in Rahuri. He also made a lecture at this time. But at the end of the program, Gadkari collapsed after the national anthem started. now he is in hospital.


Web Title: Nitin Gadkari health News
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.